माझे प्रगतिपुस्तक…… शोध शांतीचा
माणसाने जीवन जगण्यास तयार होणे हा शिक्षणाचा मूळ हेतू. मग काय ‘शिक्षण’ ही संस्था निर्माण होण्याच्या आधी माणसे जीवन जगत नव्हती? निश्चितच जगत होती. खरे तर शिक्षण ही संस्था सुरू होण्यापूर्वीच अग्नी, चाक, शेती असे माणसाच्या जीवनात आमूलाग्न बदल घडवून आणणारे क्रांतिकारक शोध लागले होते. माणसास अनेक कौशल्ये प्राप्त झाली होती. पण ती विभागलेली होती. …